आनंदाची बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू - 7th Pay Commission Maharashtra Marathi PDF

राज्यातील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येत होते, मात्र आता या कर्मचाऱ्यांच्या  वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली असून, सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली आहे, सदर कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून 7th Pay Commission चा लाभ यापूर्वी 3 मार्च 2023 च्या महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र (7th Pay Gazette PDF) नुसार लागू करण्यात आलेला होता, त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन आता 17 ऑक्टोबर 2023 रोजी सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत 7th Pay Commission Maharashtra Marathi PDF डायरेक्ट डाउनलोड लिंक या लेखामध्ये दिलेली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू - 7th Pay Commission

7th Pay Commission Maharashtra Marathi PDF

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वीच सातव्या वेतन आयोगाचा लाभ लागू करण्यात आलेला आहे , परंतु राज्यातील खाजगी शाळा मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप पर्यंत लागू करण्यात आलेला नव्हता, या कर्मचाऱ्यांना आता 2016 पासून सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात आलेला आहे.

कोणाला मिळेल लाभ?

यामध्ये केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक, अप्रशिक्षित शिक्षक, तसेच राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , माध्यमिक शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर विशेष शिक्षक शारीरिक प्रशिक्षण निदेशक इ. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.

सुधारित वेतनश्रेणी शासन राजपत्र - 7th Pay Commission Maharashtra Marathi PDF

या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार सातवा वेतन आयोगामध्ये नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सुधारित वेतनश्रेणी लागू करणेबाबत 3 मार्च 2023 च्या महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र (7th Pay Gazette PDF) नुसार लागू करण्यात आलेला होता, त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन आता 17 ऑक्टोबर 2023 रोजी सुधारित वेतनश्रेणी अधिसूचना काढण्यात आली आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post