Contract Employees Regularisation : गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित

Contract Employees Regularisation : राज्यातील मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात ठोक 'बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी' या पदनामाचे एकूण ३४ कर्मचारी कार्यरत असून, इतर महानगरपालिकांमध्ये रोजंदारीवरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले असल्याने, त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विहीत मार्गाने ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेल्या 'बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी' पदनामाच्या कर्मचाऱ्यांना, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर नियमित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित

Contract Employees Regularisation

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील, तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कार्यरत 'बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी' संवर्गातील ३४ कर्मचाऱ्यांच्या नेमणूका ह्या (जाहिरात/लेखी परीक्षा/मुलाखत) या विहीत मार्गाचा अवलंब करून झालेल्या असल्याने, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर, या कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करून, 'बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी' या पदनामाने ७ व्या वेतन आयोगानुसार, एस-८ : २५५००-८११००, या वेतनश्रेणीत, त्यांची कायम नियुक्ती करून, त्यांना महानगरपालिका सेवेत नियमित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कार्यरत ३४ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती, महानगरपालिका महासभा ठराव क्र. २७, दि.१४.१२.२०१२ व महासभा ठराव क्र. १०३, दि.३०.०१.२०१६ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार विहीत मार्गाने झाली असल्याने, सदर कर्मचारी महानगरपालिका सेवेत नियमित करण्यात पात्र ठरतात असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचे शासन आदेश दिनांक २ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post