SSC HSC Board Exam Time Table 2025 : सन 2025 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे, या परीक्षांचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक या लेखात दिलेली आहे.
विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाच्या https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 12 वी (12th Board Exam Time Table 2025) लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे, तर दहावी (10th Board Exam Time Table 2025) लेखी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
महत्वाचे - परीक्षेपूर्वी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
वेळापत्रक डाउनलोड डायरेक्ट लिंक
- बारावी बोर्ड परीक्षा 2025 वेळापत्रक येथे डाउनलोड करा
- दहावी बोर्ड परीक्षा 2025 वेळापत्रक येथे डाउनलोड करा
- बारावी बोर्ड परीक्षा 2025 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेळापत्रक येथे डाउनलोड करा
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट - https://mahahsscboard.in/