Contract Basis Employees Salary : महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासाठी प्रतिमाह रु. ४५,००० प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक - ६ पदे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ३६ पदे असे एकूण ४२ पदे कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आली आहेत.
सदर पदांना दि. २ नोव्हेंबर, २०२३ ते दि. ३० सप्टेंबर, २०२४ या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या ६ विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व ३६ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण ४२ पदांचे प्रतिमाह रु. ४५,०००/- याप्रमाणे माहे मार्च, २०२४ ते जून २०२४ या ४ महिन्यांचे एकूण रु. ७५,६०,०००/- (रुपये पंचाहत्तर लक्ष साठ हजार फक्त) इतके मानधन अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BDS) आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. (शासन निर्णय)