National Pension Scheme : राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या महिन्यात अंशदाने कपात करण्याबाबत आता सुधारणा करण्यात आली असून, वित्त विभागाने दिनांक ३ मे २०२४ रोजी नवीन शासन शुध्दीपत्रक काढले आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन शुध्दीपत्रक जारी
सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या ३ महिन्यात अंशदाने कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घेण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते, आता यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, याबाबतचे शासन शुध्दीपत्रक वित्त विभागाने काढले आहे.
आता सदर परिच्छेदामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
सर्व आहरण व संवतिरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मबाऱ्याच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या १ महिन्यात मासिक अंशदान कपात करु नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असतांना याची दक्षता घ्यावी. (शासन शुध्दीपत्रक)