आरटीई 25 टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Documents List 2025

RTE Admission Documents List 2025: शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to education) सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता नव्याने राबविण्यात येणार असून, या प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे? सविस्तर पाहूया..

आरटीई 25 टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Documents List 2025

RTE Admission Documents List 2024

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

  1. निवासी पुराव्याकरिता : रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे.
  2. जन्मतारखेचा पुरावा
  3. जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.) 
  4. उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. १लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रीया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरीता ग्राहय समजण्यात येईल.
  5. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  6. भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता : भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.

भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता आवश्यक कागदपत्रे

  • भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. 
  • भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. 
  • जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. 
  • ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक / पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आरटीईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी पालकांचे आवश्यक कागदपत्रे

पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Single Parent (विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील.

Post a Comment (0)
Previous Post Next Post