महत्वपूर्ण निर्णय! राज्यातील या प्रशिक्षणार्थीना आता विद्यावेतन मिळणार

Legislative Internship Trainees Stipend : महाराष्ट्र राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विधि विधान इंटर्नशिप उपक्रम राबविण्यात येतो, यादरम्यान सदर प्रशिक्षणार्थीना आता विद्यावेतन देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यावेतन देण्याचा निर्णय

Legislative Internship Trainees Stipend

विधि विधान इंटर्नशिप उपक्रमातील प्रशिक्षाणार्थी हे महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील महाविद्यालये तसेच विद्यापीठे यामध्ये कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात. सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व्यवस्था तसेच प्रवास खर्च स्वतःहून करावा लागतो. मुंबई सारख्या महानगरामध्ये प्रशिक्षणार्थीना येणारा सदर खर्च विचारात घेता, प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाच्या विधि व न्याय विभागातील विधि विधान शाखेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विधि विधान इंटर्नशिप उपक्रमातील प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण कालावधीमध्ये रुपये १०,०००/-(रु. दहा हजार फक्त) याप्रमाणे साधारणपणे वर्षभरात ४० प्रशिक्षणार्थीना एकूण विद्यावेतन रुपये ४,००,०००/- (रु. चार लाख फक्त) तसेच सदर उपक्रमासंदर्भातील इतर अनुषंगिक बाबींकरीता (व्याख्यात्यांचे मानधन व प्रवास खर्च, अल्पोपहार, आवश्यक स्टेशनरी, प्रशिक्षणार्थीना क्षेत्रीय भेट (Field Visit), इत्यादी) दरवर्षी रुपये १,००,०००/- (रु. एक लाख फक्त) इतक्या एकूण रुपये ५,००,०००/- (रु. पाच लाख फक्त) आवर्ती खर्चास शासन मान्यता देण्यात आली आहे.

महिलांसाठी 'या' आहेत दोन खास योजना; योजनेची संपूर्ण माहिती

सहा आठवड्यांचा 'विधि विधान इंटर्नशिप' उपक्रम

महाराष्ट्र राज्यात कायदेविषयक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना, विधि व न्याय विभागाच्या विधि विधान शाखेमध्ये, कायदे तयार करणे, कायद्यांमध्ये सुधारणा करणे, अध्यादेश प्रख्यापित करणे, विधानमंडळात विधेयके पारित करण्याची कार्यपध्दती, अधिनियमांखालील नियम तयार करणे, अधिसूचना काढणे, याची माहिती व्हावी व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तसेच त्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या कायदेक्षेत्रातील पुढील करियरसाठी व भविष्यातील वाटचालीत उपयोग व्हावा या दृष्टीकोनातून सहा आठवड्यांचा 'विधि विधान इंटर्नशिप' उपक्रम राबविण्यात येतो.

Post a Comment (0)
Previous Post Next Post