कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नॅशनल हेल्थ मिशन NHM मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून, विविध 51 संवर्गातील पदांच्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे, यास नुकतीच वित्त विभागाने मान्यता दिली आहे.